मुंबईत आयकर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘सायक्लोथॉन’चं आयोजन

१६६व्या आयकर दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून मुंबईत आयकर विभागाने आज अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सायक्लोथॉनचं आयोजन केलं होतं. अभिनेता जॉन अब्राहम, क्रिकेटपटू शिवम दुबे, थलेटिक अंजु बॉबी जॉर्ज हे या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले होते. या कार्यक्रमात ४००हून अधिक जणांना सहभाग घेतला होता. पर्यावरणपूरक वाहतूक साधनांना प्रोत्साहन देण्यासाठी सायक्लोथॉनचं आयोजन केल्याचं मनोगत मुंबईतल्या आयकर विभागाच्या प्रमुख मालती श्रीधरन यांनी यावेळी व्यक्त केलं.