नवी दिल्लीत इन्क्लुजिव्ह इंडिया परिषदेचं आयोजन

ग्लोबल ऍक्सेसिबिलीटी अवेअरनेस दिनानिमित्त, दिव्यांग व्यक्ती सक्षमता विभागानं आज नवी दिल्ली इथं ‘इन्क्लुजिव्ह इंडिया परिषद’ आयोजित केली आहे. आजचा दिवस प्रत्येक क्षेत्रामध्ये दिव्यांग व्यक्तींप्रति समावेशकता वाढवण्याचं महत्व अधोरेखित करतो. 

 

दिव्यांग  व्यक्तींसाठी भाषा, जीवन, शिक्षण आणि उपजीविकेच्या संधी सहज उपलब्ध होणं महत्वाचं आहे, असं दिव्यांग व्यक्ती सक्षमता विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी या  कार्यक्रमात सांगितलं. सांकेतिक भाषेच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार करत  असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली, आणि कॉर्पोरेट क्षेत्रानं दिव्यांग व्यक्तींसाठी अनुकूल वातावरण निर्माण करावं असं आवाहन केलं. दिव्यांग व्यक्तींचा  डिजिटल माध्यमात सहज प्रवेश आणि समावेशक विकास याबाबत जागरूकता वाढवणं हे या परिषदेचं उद्दीष्ट  आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.