डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आंध्र प्रदेशात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज विविध विकास कामांचं लोकार्पण

आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम् इथं आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं लोकार्पण, उद्घाटन तसंच पायाभरणी होणार आहे. एकंदर दोन लाख कोटींहून अधिक किंमतीच्या या प्रकल्पांमध्ये पुडीमाडाका इथल्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमेअंतर्गत पहिल्या हरित हायड्रोजन हबचा समावेश आहे. त्यासाठी अंदाजे 1 लाख 85 हजार कोटी गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे पुढील पाच वर्षात भारताचं पाचशे गिगावॅट अजीवाश्म ऊर्जा क्षमता गाठण्याची लक्ष्यपूर्ती होणार आहे.

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते, साडे एकोणीस हजार कोटी रुपये मूल्यांच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचं उद्घाटन तसंच लोकार्पण होणार आहे. तसंच दक्षिण कोस्ट रेल्वे मुख्यालय, नक्कापल्ली इथं बल्क ड्रग पार्कची पायाभरणी कऱणार आहे. या ड्रग पार्कमुळे रोजगार निर्मिती आणि विकासाला चालना मिळणार आहे. तर कृष्णपट्टमणम् औद्योगिक परिसराची पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येईल. हा प्रकल्प अंदाजे साडेदहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचा आणि एक लाख प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.