श्रीनगरमध्ये तिरंगा यात्रेसह तिरंगा स्वाक्षरी मोहीमचं उद्घाटन

जम्मू-काश्मीर  मधल्या श्रीनगर मध्ये  तिरंगा यात्रेसह तिरंगा स्वाक्षरी मोहीम सुरु झाली आहे. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज या यात्रेसह स्वाक्षरी मोहीमेचं उद्घाटन केलं. हजारो नागरिकांचा समावेश असलेल्या तिरंगा यात्रेत सिन्हा स्वतः सहभागी झाले होते. जम्मू काश्मीरमधल्या  हर घर तिरंगा मोहीमेचं  सामाजिक चळवळीत रूपांतर झालं असल्याचं ते यावेळी म्हणाले. या मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी  यावेळी केलं.