रत्नागिरीतल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण

रत्नागिरीतमधल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते काल झालं. शिवसृष्टीत उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पणही सामंत यांनी केली. ही शिवसृष्टी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या कलाकारांनी साकारली असून दोन महिन्यात हिचं काम पूर्ण होईल, असं सामंत यावेळी म्हणाले.

 

दरम्यान, रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठीच्या कामाला मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते काल सुरुवात झाली. शहरातल्या शाळा, तलाव, पदपथ विकसित करण्यासह सांडपाणी व्यवस्था भक्कम करण्यावर भर दिला जाणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.