दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं संजय जाजू यांच्या उपस्थितीत उद्घाटन

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन आज छत्रपती संभाजीनगर इथं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत होत आहे. यंदाचा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या सई परांजपे यांना प्रदान करण्यात येत आहे. या उद्घाटन सोहळ्याआधी भारतीय सिनेसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांनी १०५ वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेला प्रसिद्ध मूकपट कालियामर्दन चं विशेष प्रदर्शन होणार आहे, तर रात्री नऊ वाजता आयनॉक्स, प्रोझोन मॉल इथं लिटील जाफना या चित्रपटानं या महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.