डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं निवडलेल्या क्यु-एन-यू लॅब्ज या स्टार्टअपच्या क्यु-शिल्ड मंचाचं उद्घाटन

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं निवडलेल्या क्यु-एन-यू लॅब्ज या स्टार्टअपनं विकसित केलेल्या क्यु-शिल्ड या जगातल्या पहिल्या मंचाचं उद्घाटन कालच्या जागतिक क्वांटम दिनाच्या औचित्यानं करण्यात आलं. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला. क्वांटम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याच्या दिशेनं भारताचे प्रयत्न सुरू आहेत; त्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. संबंधित कंपन्या, व्यवसाय किंवा उद्योगांच्या महत्त्वपूर्ण पायाभूत संरचना सुरक्षित ठेवण्यासाठी क्यु-शिल्ड उपयुक्त ठरणार आहे.