उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन

भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यातील बिबवेवाड़ी इथं झालं. भगवान महावीर आणि जैन धर्मातील अन्य तीर्थंकरानी सांगितल्याप्रमाणे आपण घेण्यापेक्षा देण्यावर जास्त भर द्यायला हवा असं प्रतिपादन त्यांनी केलं. जैन समाजातील व्यक्ति कमाईपेक्षा जास्त समाजाला देण्यावर विश्वास ठेवतात. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची उन्नती करण्याचं ध्येय समोर ठेवून येणाऱ्या पिढ्यांना घडवण्याचं काम भारतीय जैन संघटना करत आहे त्यामुळे हा केवळ एका समाजाचा कार्यक्रम नसून हा भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन विषयक कार्यक्रम आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. यावेळी भारतीय जैन संघटनेचे शांतिलालजी मुथा, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.