डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

इमिग्रेशन प्रक्रिया वेगवान होण्यासाठी दिल्ली विमानतळावर नव्या सुविधेचं लोकार्पण

आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात इमिग्रेशन प्रक्रिया वेगानं व्हावी यासाठी केंद्र सरकारनं FTI-TTP अर्थात फास्टट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्रॅम नावाची विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दिल्ली विमानतळावर झालं. याचा लाभ भारतीय नागरिक आणि अनिवासी भारतीयांना होईल. यामुळे भारतीय आणि अनिवासी भारतीय नागरिक यांचा विमान प्रवास अधिक वेगवान, सुरळीत आणि सुरक्षित होईल, असा विश्वास यावेळी शहा यांनी व्यक्त केला आहे.

योजनेसाठी पात्र असलेल्या नागरिकांना ऑनलाईन अर्ज दाखल करून आवश्यक तपशिलांची नोंद करावी लागेल. त्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. देशातल्या 21 विमानतळावरही ही योजना सुरू होणार असून त्यात मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, कोची आणि अहमदाबाद या विमानतळांचा समावेश आहे.