डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 14, 2024 10:31 AM | Amit Shah | New Delhi

printer

अमित शहा यांच्याहस्ते 7व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेचं उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत, 7 व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेचं उद्घाटन केलं. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेदरम्यान, केंद्र सरकार, राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनांतील उच्चायुक्तांच्या सहकार्याने, उद्भवणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी एक पथदर्शी आराखडा तयार करण्यात येणार आहे.

 

शहा यांच्या हस्ते काल पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षक परिषदेच्या डॅशबोर्डचं अनावरण झालं. हा डॅशबोर्ड राष्ट्रीय गुन्हे गोंदणी कार्यालयाने विकसित केला आहे. प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीने होत असलेल्या या परिषदेत देशभरातून 750 हून अधिक अधिकारी सहभागी होत आहेत.