December 29, 2024 10:28 AM

printer

चौथ्या मिती लघुपट महोत्सवाचं पुण्यात उद्घाटन

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लघुपट बनविताना त्यामधे कथेचा अभाव जाणवतो असं मत, नाटककार आणि चित्रपट दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर यांनी, चौथ्या मिती लघुपट महोत्सवाचं काल पुण्यात उद्घाटन करताना व्यक्त केलं. मिती फिल्म सोसायटी आणि शिक्षण प्रसारक मंडळीद्वारे आयोजित, दोन दिवसांच्या महोत्सवाच्या उद्घाटनानंतर, वन्यजीव चित्रपट निर्माते किरण घाडगे यांचा ताडोबा एक अद्वितीय जंगल, भीमाशंकर, द सिक्रेट फॉरेस्ट आणि मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य असे निवडक भाषेतील 28 माहितीपट दाखविण्यात आले. आज छायाचित्रणावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, त्यानंतर विविध भाषांमधील लघुपट दाखवण्यात येणार आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.