महिला क्रिकेटमधे आशिया चषक टी-२० स्पर्धेत उद्या भारतीय संघाचा सामना बांगलादेशसह होणार

महिला क्रिकेटमधे आशिया चषक टी-२० स्पर्धेत उद्या भारतीय संघाचा सामना बांगलादेशसह होणार आहे. दरम्यान, काल या स्पर्धेत झालेल्या श्रीलंका विरुद्ध थायलंड सामन्यात श्रीलंकेच्या संघाचा विजय झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या थायलंडनं वीस षटकांत सात गडी गमावून ९३ धावा केल्या. हे लक्ष्य श्रीलंकेच्या संघाने अवघ्या ११ षटकांत पार करत थायलंडवर विजय मिळवला. उद्या श्रीलंकेचा सामना पाकिस्तानसोबत होईल. श्रीलंकेच्या दांबुला इथं हे दोन्ही सामने खेळवले जातील.