डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 11, 2024 2:00 PM

printer

महिला क्रिकेट स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघादरम्यान सामना खेळला जाणार

आयसीसी महिला टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज दुबईत संध्याकाळी साडेसात वाजता ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघादरम्यान सामना खेळला जाणार आहे.

 

काल शारजा इथं झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं बांगलादेशाचा आठ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत बांगलादेशनं २० षटकांत ८ खेळाडूंच्या बदल्यात १०३ धावा केल्या. बांगलादेशकडून कर्णधार निगार सुलताना हिनं ४४ चेंडूत ३९ धावा केल्या.

 

दरम्यान, भारतीय संघाची लढत १३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. अंतिम फेरीतील चार संघांत स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणं आवश्यक आहे.