डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पहिल्याच पावसात युती सरकारचं पितळ उघडं पडलं – नाना पटोले

मुंबई आणि उपनगरात अनेक भागात पाणी तुडुंब भरलं असून पहिल्याच पावसात युती सरकारचं पितळ उघडं पडलं आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या अपयशाचं खापर पावसावर फोडू नये असंही ते म्हणाले. एकाच पावसात देशाची आर्थिक राजधानी पाण्याखाली जाणं अत्यंत गंभीर आहे, सरकारनं काम केलं असत तर मुंबईची ही अवस्था झाली नसती, असं त्यांनी सांगितलं. चुकीच्या व्यक्तीच्या हातात राज्याची सूत्रं असल्यानं मुंबईसह राज्याला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत, असं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.