अमेरिकेत माइक जॉन्सन यांची काठावरच्या मतांनी सभापतिपदी फेरनिवड

अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप यांचा पाठिंबा असलेले माइक जॉन्सन यांची संसदेत सभापती म्हणून फेरनिवड झाली आहे. तीन रिपब्लिकन सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध मतदान केलं होतं, मात्र ऐन वेळी त्यांनी त्यांचं मत बदलल्यामुळे जॉन्सन यांची निवड होऊ शकली. जॉन्सन यांना 218, तर डेमोक्रॅट पक्षाचे हकीम जेफ्रीस यांना 215 मतं मिळाली आहेत. जॉन्सन यांना काठावरची मतं मिळाल्यामुळे सभागृह चालवणं त्यांच्यासाठी आव्हानाचं असणार आहे.