डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महिला क्रिकेटमध्ये पहिल्या टी-20 सामन्यात, दक्षिण आफ्रिकेची भारतावर मात

 

महिला क्रिकेटमध्ये, दक्षिण आफ्रिकेनं काल रात्री चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा 12 धावांनी पराभव केला. विजयासाठी 190 धावांचा पाठलाग करताना भारतीय महिलांनी निर्धारित 20 षटकांत 4 बाद 177 धावा केल्या. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 4 बाद 189 धावा केल्या.

 

दक्षिण आफ्रिकेसाठी तझमिन ब्रिट्सने 81 धावांचं योगदान दिलं तर भारताच्या स्मृती मन्धना हिनं 46 धावा केल्या. तझमिन ब्रिट्सला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेच्या या दौऱ्यात भारतानं 50 षटकांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला 3-0 असं पराभूत केलं आणि कसोटी सामना 10 गडी राखून जिंकला.