डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 14, 2024 7:44 PM

printer

घाटकोपरमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत १३ जण जखमी

मुंबईतल्या घाटकोपरच्या रमाबाई नगर इथल्या शांती सागर इमारतीला मध्यरात्री दीड वाजता भीषण आग लागली. यात १३ जण जखमी झाले. इमारतीच्या विद्युत मीटर केबिनला आग लागल्यानं संपूर्ण इमारतीत धूर पसरला. आगीची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत इमारतीमधील ८० ते ९० जणांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. आगीवर दीड तासात नियंत्रण मिळवलं. दरम्यान जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल केलं आहे.