डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्या गुरुवारी जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेसह सर्वच व्यवस्थेवर प्रशासनाची करडी नजर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चिकलठाणा परिसरासह जालना इथंही सभा होणार आहे.

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी काल पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांच्याही उद्या छत्रपती संभाजीनगर शहरासह कन्नड, वैजापूर, गंगापूर इथं प्रचारसभा होणार आहेत.
समाजवादी पार्टीचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे उमेदवार डॉ अब्दुल गफार कादरी यांच्या प्रचारार्थ पक्षाचे नेते इकरा हसन, सनाखान, मुफती अनस उद्या शहरात प्रचारासाठी येत आहेत.