छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वच उमेदवारांचा जनसंवादावर भर

काल सुटीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी पदयात्रा, जनसंवाद आणि सभा घेण्यावर भर दिल्याचं दिसून आलं. औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी काल पदयात्रा काढली. याच मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार लहु शेवाळे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांची सभा झाली. औरंगाबाद मध्यचे महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी काल पदयात्रा काढून जनतेशी संवाद साधला. औरंगाबाद पश्चिम मतदार संघातले माहाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी देखील घरोघरी जाऊन नागरीकांशी संवाद साधला. एम आय एम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी काल औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.