July 31, 2024 1:35 PM

printer

घड्याळ चोरीप्रकरणी बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यातून १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

मुंबईतल्या एका घड्याळाच्या दुकानाचं शटर तोडून २५ लाख रुपयांच्या घड्याळ चोरीप्रकरणी बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यातून १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील ३ आरोपींना याआधीच मुंबईत अटक करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वीच या परिसरातून मुंबई पोलिसांनी ५३ लाख रुपयांच्या मोबाईल चोरी प्रकरणी दोघाना अटक केली होती.