डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बांगलादेशात सरकारी नोकर भरतीतील कोट्यात सुधारणेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण

बांगलादेशात, सरकारी नोकऱ्यांच्या भरतीसाठीच्या कोटा प्रणालीमध्ये सुधारणा व्हावी या मागणीसाठी विद्यापीठांतील विद्यार्थी आणि शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गेल्या दोन दिवसांत हिंसक वळण लागलं असून त्यामध्ये ६ जणांना जीव गमवावा लागला आहे तर, शेकडो जखमी झाले आहेत. यामुळे सरकारनं सर्व शैक्षणिक संस्था अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ढाका आणि इतर प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस, बॉर्डर गार्ड बांगलादेश आणि इतर निमलष्करी दलांची पथकं नियुक्त केली आहेत.