आसाममध्ये आजपासून प्रसिद्ध कामाख्या मंदिरात अंबुबाची मेळा सुरू

आसाममध्ये आजपासून प्रसिद्ध कामाख्या मंदिरात अंबुबाची मेळा सुरू झाला आहे. 26 जून रोजी याची सांगता होणार असून अंबुबाची मेळ्यासाठी देशभरातून आलेले लाखो भाविक जमले आहेत. कामाख्या देवीची, प्रजनन आणि स्त्रीत्वाचं प्रतीक असलेली वार्षिक मासिक पाळी साजरी करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. उत्सवादरम्यान, कामाख्या मंदिराचे दरवाजे बंद राहतील. 25 जून रोजी रात्री 9 वाजून 8 मिनिटांनी मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडतील. कामरूप मेट्रो जिल्हा प्रशासनाने आलेल्या भाविकांसाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.
मध्ये आजपासून प्रसिद्ध कामाख्या मंदिरात अंबुबाची मेळा सुरू झाला आहे. 26 जून रोजी याची सांगता होणार असून अंबुबाची मेळ्यासाठी देशभरातून आलेले लाखो भाविक जमले आहेत. कामाख्या देवीची, प्रजनन आणि स्त्रीत्वाचं प्रतीक असलेली वार्षिक मासिक पाळी साजरी करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. उत्सवादरम्यान, कामाख्या मंदिराचे दरवाजे बंद राहतील. 25 जून रोजी रात्री 9 वाजून 8 मिनिटांनी मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडतील. कामरूप मेट्रो जिल्हा प्रशासनाने आलेल्या भाविकांसाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.