डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारताला २०२७पर्यंत विकसित देश बनवण्यात क्रीडाक्षेत्राची महत्त्वाची भूमिका – क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडवीय

भारताला २०२७ पर्यंत विकसित देश बनवण्यात क्रीडाक्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असं प्रतिपादन युवा कल्याण आणि क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं मांडवीय यांनी आज भारताचे ऑलिम्पिकपटू आणि पॅरालिम्पिकपटूंशी संवाद साधला. देशाच्या क्रीडापटूंना योग्य मदत आणि संधी मिळाल्या, तरच भारताला मिळणाऱ्या पदकांची संख्या वाढले आणि सरकार या दिशेने सरकार पावलं उचलत आहे, असंही त्यांनी सांगितलं. आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या तयारीवर प्रकाश टाकणाऱ्या पाथवे टू पॅरिस या पुस्तिकेचं प्रकाशनही मांडवीय यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.