वनविभागाच्या महत्त्वाच्या बैठकांचं आयोजन आज आणि उद्या नागपूरमध्ये करण्यात आलं आहे. प्रामुख्यानं वाघ आणि मानवी संघर्ष संदर्भात तसंच वाघांच्या मृत्यूबद्दल या बैठकीत चर्चा होणार असून, वन विभागाचं उत्पन्न वाढावं यासाठी वनविकास महामंडळ,जलपर्णी विभाग आणि सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत असं वनमंत्री गणेश नाईक यांनी आज नागपूरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. राज्यातली ६५ टक्के वनं विदर्भात असून वनविभागाची बहुतांश कार्यालयं देखील विदर्भात आहेत.
Site Admin | April 9, 2025 3:23 PM | गणेश नाईक | वनविभाग बैठका
वनविभागाच्या महत्त्वाच्या बैठकांचं आज आणि उद्या नागपूरमध्ये आयोजन
