डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नागपूरमधल्या दीक्षाभूमी स्तुपाजवळच्या भूमिगत पार्किंगच्या बांधकामाला तत्काळ स्थगिती

नागपूरमधल्या दीक्षाभूमी स्तुपाजवळच्या भूमिगत पार्किंगविरोधात आज आंबेडकरी संघटनांनी आंदोलन केल्यानंतर या बांधकामाला तत्काळ स्थगिती देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. दीक्षाभूमी सुधार आराखड्यावर काही आक्षेप असतील तर त्यावर सर्वांशी चर्चा करून आवश्यक सुधारणा करण्यात येतील असं फडणवीस म्हणाले. दीक्षाभूमीच्या मुख्य स्तुपाला या पार्किंगमुळे धोका निर्माण होईल, असा आंदोलकांचा आक्षेप आहे. दीक्षाभूमीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि संघटनांमध्ये या आक्षेपांबाबत चर्चा सुरू होती. पण त्यावर तोडगा न निघाल्याने आज आंबेडकरी संघटनांनी आंदोलन केलं.