विदर्भ, गुजराथचा काही भाग, छत्तीसगढ आणि ओदिशा इथे नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल सुरु आहे. उत्तर भारतात उत्तराखंड,हरयाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य राजस्थानमध्ये आज तर मध्यप्रदेशचा पूर्व भाग, छत्तीसगढ, विदर्भ, पश्चिम बंगाल, सिक्किम, बिहार,झारखंड आणि ओदिशा इथे या महिन्याच्या वीस तारखेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे असा अंदाज भारतीय हवामानखात्याने वर्तवला आहे. इशान्य भारतात पुढील तीन दिवस कमाल तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसची घट होईल असंही विभागाने म्हटलं आहे.
Site Admin | June 15, 2025 6:12 PM | IMD
विदर्भ, गुजरात, छत्तीसगढ आणि ओदिशात नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल सुरु
