महाराष्ट्र, ओदिशा, छत्तीसगडला हवामान विभागाने उद्या रेड अलर्ट जारी केला आहे. पुढचे चार दिवस कोकण, विदर्भासह महाराष्ट्राचा काही भाग, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओदिशा, पश्चिम बंगालमधला गंगेचा किनारी भाग आणि झारखंडमधे जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये या महिन्याच्या शेवटपर्यंत जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर केरळ, दक्षिण कर्नाटकमधेही मुसळदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असं हवामान विभागानं कळवलं आहे.
Site Admin | July 24, 2025 8:24 PM
महाराष्ट्र, ओदिशा, छत्तीसगडला पावसाचा रेड अलर्ट
