आसाम आणि मेघालयात तुरळक ठिकाणी आज मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केली आहे. मात्र उत्तर प्रदेशाचा पूर्वेकडचा भाग, गंगेजवळचा पश्चिम बंगाल आणि झारखंड इथे आज उष्णतेची लाट अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.
येत्या तीन दिवसांत आसाम , मेघालय , अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा इथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच या कालावधीत मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, सिक्कीम , बिहार इथे ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे.