राज्यात उद्या रायगड, रत्नागिरी, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या सहा जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट परिसराला हवामान विभागानं रेड अलर्ट दिला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना परवा रात्री पर्यंत उंच लाटा उसळण्याचा इशाराही राज्य आपत्कालीन केंद्राने दिला आहे. या काळात लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच, पालघर जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर झाली आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात पाणी पुरवठा करणाऱ्या मोडक सागर, मध्य वैतरणा आणि तानसा या धरणातून विसर्ग सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून आसपासच्या रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. पवना धरण ८२ टक्के भरलं आहे.
Site Admin | July 25, 2025 8:40 PM | Red Alerts
पालघर, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट
