July 19, 2025 3:23 PM | IMD weather

printer

केरळ आणि उत्तराखंडमधे उद्यापर्यंत रेड अलर्ट जारी

केरळ आणि उत्तराखंडच्या काही भागासाठी हवामान विभागानं उद्यापर्यंत अती जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, आसाम, तामिळनाडू, कोकण, गोवा आणि कर्नाटकमध्ये देखील आज जोरदार ते अती जोरदार पावसाचा  ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

 

बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि हरियाणा मध्ये तुरळक ठिकाणी येत्या २४ जुलै पर्यंत जोरदार पाऊस पडेल, तर ईशान्य भारतात पुढले ७ दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.