डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशाच्या सर्व भागात उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागानं उद्या आसाम, मेघालय, कर्नाटकाचा किनारी भाग आणि दक्षिण कर्नाटक, केरळ, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. अरुणाचल प्रदेश,ओडिशा,तेलंगणा,पश्चिम बंगाल आणि सिक्कीम इथेही उद्या जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे. उत्तराखंड, बिहार, छत्तीसगढ, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, झारखंड, कोकण,गोवा,मध्य महाराष्ट्र,विदर्भ आणि पश्चिम मध्य प्रदेश इथेही जोरदार पर्जन्यमान होईल असा अंदाज आहे. ईशान्य भारतात पुढचे ७ दिवस मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडेल,वीजाही चमकतील तर शुक्रवारपर्यंत पश्चिम राजस्थानात उष्णतेची लाट पसरेल आणि धुळीची वादळं होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.