डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 28, 2025 4:56 PM | IMD

printer

देशभरात यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस जास्त पडण्याचा अंदाज

देशभरात यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य प्रमाणापेक्षा जास्त पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. देशात यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन लवकर झालं आहे. पुढच्या महिन्यात वायव्य भारतात काही भागांमध्ये तसंच मध्य आणि पूर्व भारतात उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी होण्याची  शक्यता आहे. कर्नाटकचा किनारी भाग, केरळ, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा इथं काही ठिकाणी पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, पश्चिम राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.