२०४७ पर्यंत भारत विकसित भारतासाठी नवोन्मेष हा एक प्रमुख कणा असून त्यासाठी धोरण, संशोधन, आणि उद्योग यांना जोडण्यात आय़आय़एम मुंबईची महत्त्वाची भूमिका असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज म्हटलं आहे. आयआयएम मुंबई इथं आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. आयआयएम मुंबईनं इनक्यूबेशन फाउंडेशन फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिपच्या उद्घाटनासह एक महत्त्वाचा टप्पा गाठला असल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | June 24, 2025 7:25 PM
धोरण, संशोधन, आणि उद्योग यांना जोडण्यात IIM मुंबईची महत्त्वाची भूमिका-जितेंद्र सिंह
