November 8, 2025 9:46 AM | Goa | iffi

printer

इफ्फी 20 नोव्हेंबरपासून गोव्यात रंगणार

गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवईफ्फी हा भारतीय निर्मात्यांना जागतिक स्तरावर पोहोचवणारा एक महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वास माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन यांनी व्यक्त केला आहे. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

20 नोव्हेंबरपासून इफ्फी चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार असून यात 81 देशांतील 240 चित्रपट दाखवले जाणार असल्याची माहिती मुरुगन यांनी दिली. हा महोत्सव 28 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

 

महिलांनी दिग्दर्शित केलेले 50हून अधिक चित्रपट हे या वर्षीचं आणखी एक आकर्षण ठरेल, असं मुरुगन म्हणाले.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.