सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाचा संयोग ही येत्या इफ्फी २०२५ ची संकल्पना असल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं. ते आज पणजी इथं आगामी ५६ व्या इफ्फीच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान पणजीत इफ्फी महोत्सव रंगणार आहे. या सोहळ्याला ८० देशांतले चित्रपटनिर्माते भेट देणार असून देश विदेशातले २७० हुन अधिक चित्रपट एकत्र येणार आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीतल्या योगदानाबद्दल गुरुदत्त, राज खोसला, भानुमती, भुवन, रित्विक तसंच रजनीकांत आणि बालकृष्ण यांचा या महोत्सवात गौरव करण्यात येणार असल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी यावेळी सांगितलं.
Site Admin | November 15, 2025 8:03 PM | #IFFI #IFFI2024 #IFFI55 #TheFutureIsNow | Pramod Sawant
सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाचा संयोग ही येत्या इफ्फी २०२५ ची संकल्पना आहे – मुख्यमंत्री प्रमोद सावंत