इफ्फी चित्रपट महोस्तवाच्या फिल्म बाजारमध्ये महाराष्ट्र फिल्मसिटी मुंबईचं दालन आकर्षणाचा केंद्रबिंदू

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजारमध्ये महाराष्ट्र फिल्मसिटी मुंबईचं दालन उभारण्यात आलं ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. देशोदेशीचे कलाकार, दिग्दर्शक, निर्माते तसंच अधिकारी या  दालनाला भेट देऊन कौतुक करत आहेत. या स्टॉलमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे फिल्म बाजारात आलेल्या चार चित्रपटांची माहिती, चित्रपटांच्या लोकेशन करिता लागणाऱ्या परवानगी देणारी फिल्म सेल प्रणाली,कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ कलासेतू पोर्टल आदी गोष्टींचा प्रचार व्यापक स्वरूपात करण्यात येत आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अनंत महादेवन, निखिल महाजन यांच्या सह विविध कलाकारांनी या स्टॉल ला  भेट दिली आहे.शिवाय केंद्रीय सचिव संजय जाजु यांनी देखील स्टॉलला भेट देऊन  कौतुक केलं.