डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

इफ्फीमध्ये यंदा राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांचेही चित्रपट दाखवणार

इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा राज कपूर, तपन सिन्हा, अक्किनेनी नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांच्या समृद्ध वारशाला आदरांजली वाहण्यासाठी पुनर्संचयित केलेले चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. यात राज कपूर यांचा आवारा, तपन सिन्हा दिग्दर्शित हार्मोनियम, अक्किनेनी नागेश्वर राव यांचा देवदासू या चित्रपटांचा समावेश आहे. मोहम्मद रफी यांनी गायलेली गीतं समाविष्ट असलेला हम दोनो हा चित्रपट देखील यावेळी दाखवला जाईल. तसंच, या दिग्गजांच्या आठवणींचं प्रदर्शनही या महोत्सवात भरवण्यात येणार आहे.