गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या इफ्फी अर्थात ५६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आजच्या चौथ्या दिवशी जगभरातील विविध चित्रपट तसंच कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इफ्फी महोत्सवात ICFT UNESCO गांधी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अनुपम खेर यांचा ‘तन्वी द ग्रेट’ हा चित्रपट या पुरस्कारासाठीच्या स्पर्धेत आहे. तसंच आज अनुपम खेर आज ‘हार मानणं हा पर्याय नाही’ या विषयावर मास्टरक्लास घेणार आहेत.