गोव्यात सुरू असलेल्या ५६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आजही जगभरातले विविध चित्रपट दाखवले जात आहेत. ‘ऑरेंडा’, ‘कॉटन क्वीन’, ‘अ पोएट’, ‘स्लीपलेस सिटी’, ‘द वुमन’ या चित्रपटांचा यात समावेश आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला आणि इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाच्या शर्यतीत असलेला ‘फ्यूरी’ हा चित्रपट आज दाखवण्यात आला. याशिवाय, अभिनेता आमिर खानचा मास्टरक्लास तसंच शोले चित्रपटाला ५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं रमेश सिप्पी आणि किरण सिप्पी यांचंही सत्र आज होणार आहे. त्याचप्रमाणे नागार्जुन आणि सी. व्ही. राव हेही आपले विचार मांडणार आहेत. यंदा इफ्फीमध्ये ‘प्यासा’, ‘गमन’, ‘उमराव जान’, ‘डॉक्टर कोटणीस की अमर कहानी’ असे क्लासिक चित्रपट दाखवले जात आहेत. दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज विख्यात चित्रकर्मी के. वैकुंठ यांच्या स्मरणार्थ एका विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन केलं. १९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या के. वैकुंठ यांचा ‘गोवा मार्चेस ऑन’ हा माहितीपटही यावेळी दाखवण्यात आला.
Site Admin | November 27, 2025 1:28 PM | IFFI 2025
IFFI 2025 : जगभरातले विविध चित्रपट दाखवले जाणार