November 27, 2025 8:13 PM | Aamir Khan | IFFI 2025

printer

इफ्फी महोत्सवात अभिनेता आमीर खान यांचा मास्टरक्लास

इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बॉलिवूड अभिनेता आमीर खान यांनी आज सामाजिक परिवर्तनाचे कथाकार या विषयावर मास्टरक्लास घेतला. चित्रपटांमध्ये लेखन आणि कथाकथन तसंच, अभिजात कथा आणि कल्पनाविष्कार यावेत यासाठी लेखकांना प्राधान्य देण्याची गरज यावेळी खान यांनी व्यक्त केली. या महोत्सवात आज ‘अ पोएट’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. तसंच, व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला ‘डॉ. कोटनीस की अमर कहानी’, १९८२ साली प्रदर्शित झालेला ‘केलॅमिटी’ हा चेक चित्रपट आणि मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला ‘गीतांजली’ हे चित्रपटही आज दाखवण्यात आले. उद्या, ‘अ युजफुल घोस्ट’ या थाई चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर इफ्फीची सांगता होणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.