५६वा इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आजच्या सहाव्या दिवशी विविध जागतिक चित्रपट, मास्टरक्लासेस यासह विविध कार्यक्रमांची मेजवानी सिनेरसिकांना मिळत आहे. ‘माय फादर्स शॅडो’ हा नायजेरियन चित्रपट, ‘जॅनिटर’ हा मेक्सिकन चित्रपट आणि ‘एलेफंट मेमरी’ हा ब्राझिलियन चित्रपट आज या महोत्सवात दाखवण्यात आला. तसंच ‘के पॉपर’ हा इराणी चित्रपट आणि ‘इट्स अ सॅड अँड ब्यूटिफुल वर्ल्ड’ या कतारी चित्रपटाचा आस्वादही सिनेरसिकांनी घेतला. ऑस्कर पुरस्कार विजेते ख्रिस्तोफर चार्ल्स कोरबोल्ड यांनी साहसदृश्यं, स्पेशल इफेक्ट्स याबद्दल मास्टरक्लास घेतला. कृत्रिम बुद्धिमत्ता हे चित्रपटनिर्मितीचं सर्वात लोकशाही-अभिमुख माध्यम असल्याचं प्रतिपादन प्रसिद्ध निर्माते शेखर कपूर यांनी केलं. दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांना आज इफ्फीत आदरांजली वाहण्यात आली.
Site Admin | November 25, 2025 8:25 PM | IFFI 2025
IFFI 2025: विविध कार्यक्रमांची सिनेरसिकांना मेजवानी