November 24, 2025 2:45 PM | IFFI 2025

printer

IFFI 2025: बालपणाच्या विविध छटा आणि संघर्षाविषयीचे चित्रपट दाखवण्यासाठी युनिसेफबरोबर भागीदारी

गोव्यात सुरू असलेल्या ५६व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज बालपणाच्या विविध छटा आणि संघर्षाविषयीचे विविध चित्रपट दाखवण्यासाठी युनिसेफ अर्थात संयुक्त राष्ट्र बालनिधीबरोबर भागीदारी केली आहे. मुलांचे प्रश्न, आव्हानं आणि संधी यांची मांडणी करण्यासाठी इफ्फीत पाच चित्रपट दाखवले जात आहेत. हे सर्व चित्रपट भारत, कोसोवो, इजिप्त, दक्षिण कोरिया अशा विविध देशांचे असून यांमुळे प्रेक्षकांना सांस्कृतिक सीमा ओलांडून लहान मुलांचं जग अनुभवता येईल, असं मनोगत युनिसेफच्या भारतातल्या प्रतिनिधी सिंथिया मॅककॅफ्रे यांनी व्यक्त केलं. 

 

त्याशिवाय इफ्फी महोत्सवात आज एआय हॅकेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. इफ्फीच्या इतिहासात प्रथमच अशा उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान तज्ज्ञ एकत्र येऊन नावीन्यपूर्ण एआय-आधारित प्रणाली तयार करणार आहेत. दरम्यान वेव्हज फिल्म बाजार सध्या चित्रपट निर्माते आणि कलाकारांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. आज या सोहळ्यात ‘फ्यूम ओ मोर्टे’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे, आज प्रदर्शित होणारा पहिला जपानी चित्रपट ‘टू स्ट्रेंजर्स, टू सीझन्स’ आहे. चित्रपट निर्माते आणि संपादक राजू हिरानी आज एडिटिंग या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.