डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

हमासने इस्त्रायलचे ओलीस सोडले नाही तर इस्रायल आणि हमासमधील युद्धविराम करार रद्द करावा – डोनाल्ड ट्रम्प

हमासने इस्त्रायलचे ओलीस शनिवारी दुपारपर्यंत सोडले नाहीत तर इस्रायल आणि हमास यांच्यातला युद्धविराम करार रद्द करायला हवा, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इस्रायलने युद्धविराम कराराचा भंग केल्याचा आरोप करत हमासने ओलीसांना सोडायला उशीर लावल्यानंतर ट्रम्प यांनी हे विधान केलं आहे. इस्रायलने सर्व ओलीसांना सोडायची मागणी करावी नाहीतर पुन्हा एकदा युद्ध सुरू करावं असंही ट्रम्प म्हणाले. याआधीच्या एका मुलाखतीत ट्रम्प यांनी गाझा पट्टी ताब्यात घेण्याबद्दल वक्तव्य केलं होतं. गाझा पट्टीतल्या पॅलिस्टीनी लोकांना इजिप्त आणि जॉर्डन या देशांनी सामावून घ्यावं, असंही ते म्हणाले होते.