भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने आयएससीई इयत्ता १० वी आणि आयएससी इयत्ता १२ वी चे निकाल आज जाहीर केले. दोन लाख पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती तर ९९ हजार पाचशे एकावन्न विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
दहावीत ९९ पुर्णांक ३७ टक्के गुणांसह मुलींनी वर्चस्व राखलं तर एकुण ९८ पूर्णांक ८४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दरम्यान, बारावीच्या परीक्षेतही मुलींनी चांगली कामगिरी केली असून ९९ पुर्णांक ४५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या तर विद्यार्थ्यांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे ९८ पुर्णांक ६४ टक्के इतकं राहीलं. विद्यार्थांना cisce.org आणि results.cisce.org या संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येणार आहे.