डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

July 14, 2025 8:06 PM | IChO2025 | India

printer

५७व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमधे ४ भारतीय विद्यार्थ्यांना पदक

५७व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमधे सहभागी झालेल्या सर्व ४ भारतीय विद्यार्थ्यांनी पदक मिळवलं असून पदक तालिकेत भारताला सहावं स्थान मिळालं आहे. जळगावचा देवेश पंकज भैया आणि हैद्राबादचा संदीप कुची यांना सुवर्णपदक मिळालं असून भुवनेश्वरचा देबदत्त प्रियदर्शी आणि नवी दिल्लीचा उज्ज्वल केसरी या विद्यार्थ्यांनी रौप्य पदकं मिळवली आहेत. संयुक्त अरब अमिरातींमधे दुबई इथं ५ जुलैला सुरु झालेल्या या ऑलिंपियाडचा आज समारोप झाला. ९० देशांनी त्यात सहभाग नोंदवला असून पदक तालिकेत भारताला सहावं स्थान मिळालं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.