आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होत आहे. नवी मुंबईत डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे.
गोहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडवर १२५ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघानं ५० षटकांत सात खेळाडू गमावत ३१९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ १९४ धावांवर गारद झाला. महिला क्रिकेटमधे दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.