Women’s World Cup: भारत-बांगलादेश सामन्यात पावसाचा व्यत्यय

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर  सुरु असलेल्या सामन्यात पावसानं व्यत्यय आणला आहे. पावसामुळे मैदान ओलं झाल्यानं हा सामना उशारा सुरु झाला. भारतानं नाणेफेक जिंकून बांगलादेशाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. विलंबामुळे हा सामना प्रत्येकी ४३ षटकांचा केला आहे. बांगला देशाच्या तेराव्या षटकात २ बाद ३९ धावा झाल्या असताना पावसामुळे खेळ थांबवावा लागला. 

 

या स्पर्धेत गुणतालिकेत भारत ६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. तर बांगलादेश शेवटच्या स्थानावर आहे.