Womens ODI Cricket: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना

आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये अंतिम फेरीचा सामना रंगेल.  नवी मुंबईतल्या  डॉ. डी. वाय. पाटील क्रीडा संकुलात दुपारी ३ वाजता हा सामना सुरु होईल. 

 

गुरुवारी नवी मुंबई मध्ये झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा  पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर गुवाहाटी इथं  झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीत  दक्षिण आफ्रिकेनं  इंग्लंडवर १२५ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच अंतिम फेरीत खेळत आहे, तर भारताला अद्याप विजयाची चव मिळालेली नाही. 

 

पुरुषांच्या क्रिकेटमधे भारत-ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी मालिकेतला  तिसरा सामना होबार्ट इथं होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज दुपारी पावणेदोन वाजता सुरु होईल. कॅनबेरा इथं झालेला सामना पावसामुळं रद्द झाला होता.