आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्व चषक स्पर्धेत आज विशाखापट्टणम इथं सुरु असलेल्या सामन्यात बांगलादेशानं ऑस्ट्रेलियापुढं विजयासाठी १९९ धावांच आव्हान ठेवलं आहे. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून, प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. आणि निर्धारित ५० षटकात ९ गडी गमावून १९८ धावा केल्या.
या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हेली आणि फोएबे लिचफिल्ड यांनी फटकेबाजी करत अर्धशतकं पूर्ण केली. शेवटची बातमी हाती आली तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या २१ षटकात बिनबाद १५५ धावा झाल्या होत्या. या स्पर्धेत भारताचा पुढचा सामना येत्या रविवारी इंग्लंडबरोबर होणार आहे.
 
									 
						 
									 
									 
									