डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आयसीसी टी ट्वेंटी क्रिकेट जागतिक मानांकनं जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने यंदाची पुरुष टी ट्वेंटी ची क्रमवारी जाहीर केली आहे. झिम्बाब्वेविरुद्ध ४-१ नं टी-२० मालिका जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी ताज्या क्रमवारीत वरचं स्थान मिळवलं आहे. फलंदाजीत भारताच्या सूर्यकुमार यादवनं आपलं दुसरं स्थान कायम राखलं आहे, तर यशस्वी जैस्वाल सहाव्या स्थानावर आहे. ऋतुराज गायकवाड क्रमवारीत एका क्रमांकानं घसरून आठव्या स्थानावर आला आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत, हार्दिक पंड्या हा टॉप टेन मधला एकमेव भारतीय खेळाडू आहे, तर श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगा यानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे.